देशमुखांना ईडीने दिला जोरदार दणका, कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त

 

मुंबई | राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते आता त्या पाटोपाठ ईडीने कारवाई करून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या. तसेच या आरोपांमुळे देशमुखांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या ताब्यात घेतला असून आता कारवाई सुद्धा सुरू केली आहे.

आपल्यावर झालेल्या आरोपांनंतर तसेच मुंबई हायकोर्टाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी एप्रिल महिन्यात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वी ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून अनिल देशमुख यांच्या घरी धाड सुद्धा टाकण्यात आली होती. तसेच देशमुखांच्या मुलाला तसेच पत्नीलाही ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली होती.

Team Global News Marathi: