पुण्यात “बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवन’ उभारण्यासाठी शिंदे गटाची लगबग

 

पुणे | मुंबईप्रमाणेच पुणे येथील शिंदे गटाचे कामकाज शिवसेना भवनातून होणार आहे. प्रति शिवसेना भवन उभारण्याचे काम सारसबाग परिसरातील एका इमारतीमध्ये सुरू करण्यात आले आहे, याकरिता शिंदे गटाचे माजी नगरसेवक शदे गटाचे शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी पुढाकार घेतला आहे. पुणे शहरातही प्रति शिवसेना भवन उभारले जाईल, असे शिंदे गटाचे शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी जाहीर केले होते.

याच पार्श्वभूमीवर त्यानुसार शहराच्या मध्यवर्ती भागातील काही जागांची पाहणी करण्यात आल्यानंतर सारसबाग येथील इमारतीमधील जागा निश्‍चित करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकार तसेच महापालिकेच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांना हक्काची जागा या शिवसेना भवनातून मिळणार आहे.

या भवनाला “बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवन’, असे नाव देण्यात आले असून चार हजार चौरस फूट जागेत असलेल्या या भवनमध्ये सध्या फर्निचरसह इतर कामे वेगाने सुरू आहेत, असे शिंदे गटाचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी सांगितले. या शिवसेना भवनमध्ये सुरू असलेली कामे डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण केली जाणार आहे तर जनोवारीत “बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवन’चे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजित असल्याचेही भानगिरे यांनी सांगितले.

Team Global News Marathi: