अदर पूनावाला यांच्या व्यवहाराबद्दल संशय – नवाब मलिक

संपूर्ण जगभरात कोरोना रोखण्यासाठी लस बनवणारी अव्वल कंपनी असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांना लसींसाठी मोठ्या प्रमाणात फोन येत असून काही जणांकडून धमक्याही दिल्या जात असल्याची माहिती पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिली होती. मला येणारे फोन कॉल्स अत्यंत वाईट बाब आहे. फोन करणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांचा समावेश देखील आहे, असं अदर पूनावाला यांनी म्हटलं होत. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.

या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. आता यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुनावाला यांच्या व्यवहारावरच शान उपस्थित केली आहे. केंद्र सरकारला १५० रुपये, राज्याला आधी ४०० रुपये आणि नंतर ३०० रुपये, तर खाजगी रुग्णालयांना ७०० रुपये दराने लस देण्याचे अदर पूनावाला यांनी जाहीर केले. हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून त्याला पूनावाला स्वत: जबाबदार आहेत. त्यांना कोणी बदनाम करीत नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

तसेच सीरम इन्स्टिटय़ूटचे अदर पूनावाला यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिस शोध घेतील. भारताबाहेर तपास करण्याचीही महाराष्ट्र पोलिसांची क्षमता आहे. मात्र त्यासाठी पूनावाला यांनी कोणत्या क्रमांकावर धमकीचा फोन आला, कोणाकडून मिळाला याची सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी. धमकी देणारा कोणीही असला तरी कारवाई केली येईल, असं गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी बोलुंन दाखवले होते.

Team Global News Marathi: