पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा कौर यांच्यावर साधला निशाणा

 

सध्या संपूर्ण देशभरात इंधनदारवाढीचा फटका सामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे. ईकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे या इंधन दरवाढीला आता राजकीय रंग चढू लागला आहे.

त्यातच खासदार नवणीत राणा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये त्या चक्क चूलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र शेअर केला जातोय. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नवणीत राणा यांचा व्हिडीओ रिट्विट करत कमेंट केली आहे.

गॅस महाग झाल्यामुळे खासदार नवनीत राणा यांना गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे, असा टोला रूपाली चाकणकर यांनी लगावला आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत, असंही चाकणकर म्हणाल्या. तर वा मोदीजी वा, असा त्यांचा नेहमीचा डायलाॅग देखील त्यांनी उपरोधिकपणे मारला आहे.

Team Global News Marathi: