बीफ खाण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सामनातून भाजपावर घणाघाती टीका !

 

मुंबई | गोमांस खाण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापू लागले आहे. कारण मेघालयचे भाजपचे मंत्री सनबोर शुलाई यांनी ‘ बीफ’ खाण्याचे समर्थन केले आहे. यावरुन शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका करत मोदींच्या पहिल्या पर्वात मॉब लिंन्चिगमध्ये बळी झालेल्यांची भाजपने माफा मागावी, अशी मागणी शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनामधील अग्रलेखातून केली आहे. मेघालयच्या भाजप मंत्र्यांनी चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे, असा सल्ला त्यांनी लोकांना दिला. या विधानावरून शिवसेनेने भाजपाच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.

“भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्यांचे हिंदुत्व राजकीय सोयीचे आहे काय, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या मोदी पर्वात गोवंश हत्येचा विषय बासनात गुंडाळला गेला असून गोमातांचा दर्जा खाली गेला आहे”, असे म्हणत शिवसेनेने झुंडबळी ठरलेल्यांची भाजपाने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

मेघालयात भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुलाई यांनी देशातील समस्त मांसाहारी मंडळींना एक दिव्य संदेश दिला आहे. मंत्रिमहोदय सांगतात, ‘लोकहो, चिकन, मटण, मासे कसले खाता? बीफ खा बीफ! गोमांस खा. त्यातच मजा आहे!’ गोमांस भक्षणाची ही अशी तरफदारी करणाऱ्या भाजप मंत्र्यांनी असे हिंदुत्वविरोधी वक्तव्य करूनही या महाशयांचा बालही बाका झाला नाही. भाजप हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्यांचे हिंदुत्व राजकीय सोयीचे आहे काय, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करण्याची वेळ आली आहे.

Team Global News Marathi: