…पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे यांचे राज ठाकरेंनी केले तोंडभरून कौतुक

 

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वर्णन केलं. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये आयोजित पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ओजंळ पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यास स्वत: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पद्मविभूषण आशा भोसले, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलाताना राज ठाकरे म्हणाले, ”आज बऱ्याच वर्षांनी मी शिवसृष्टीत आलो, इथे दाखल होत असताना मला जुनी शिवसृष्टी आठवली जी बाबासाहेबांनी शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर साकारली होती, १९७४ मध्ये त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो. मी रोज त्या शिवसृष्टीत जात असे आणि संध्याकाळचा राज्यभिषेक सोहळा मी पाहत होतो. पहिल्यांदा त्या शिवसृष्टीत भवीन तलावर आणली गेली होती आणि बाबासाहेब ती घेऊन आले होते.

आज त्या भवानी तलावरीचं स्वागत बाळासाहेबांनी त्या वेशीवर केलं होतं, तेव्ही मी देखील तिथे होतो. त्यावेळी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं आणि तेव्हापासून आजपर्यंत माझं भाग्य की मी त्यांना भेटू शकलो, त्यांच्या सहवसात राहू शकलो. अनेक गोष्टी शिकू शकलो. त्यावेळी एकदा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः बाबाहेबांनी काम केलं होतं आणि ते मी पाहिलं आहे. अशा सभाडत राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.

Team Global News Marathi: