अंगावर माकड बसल्याचा भीतीने एका मुलाने गमावला आपला जीव |

 

नांदेडमध्ये अंगावर माकड येऊन बसल्याच्या भीतीने एका चिमुकल्याने आपला जीव गमावला आहे. सदर घटना मुदखेड तालुक्यातील बारड गावातील घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

दहा वर्षीय वीर नागेश संगेवार हा घरासमोर खेळत होता. त्याचवेळी एक माकड त्याच्या अंगावर येऊन बसले. अचानक अंगावर माकड येऊन बसल्याने वीर खूप घाबरला होता. त्याने याची भयंकर धास्ती घेतली होती. त्याच्या भीतीनेच त्याला ताप भरला. यामुळे त्याला तातडीने नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

तसेच ताप उतरत नसल्यामुळे त्याच्या विविध आजाराच्या तपासण्या करण्यात आल्या. मात्र, त्या सर्व नॉर्मल आल्या. डॉक्टरांनी वीरशी बोलणं केलं असता त्याला माकडाची खूप भीती होती हे लक्षात आलं. त्याला सतत माकडं पुन्हा येईल असं वाटत होतं. यामुळेच त्याला तापही आल्याचं समोर आलं.

माकडांबद्दलची त्याच्या मनातील दहशत कमी झाली नव्हती. यामुळेच त्याला १३ ऑगस्ट रोजी त्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांनाही मोठा धक्का बसला आहे. तर पालकांमध्येही यामुळे चिंतेचं वातावरण आहे.

Team Global News Marathi: