आरक्षणाच्या मुद्द्यावर दानवे आणि राणे का गप्प राहिले?; मराठा आरक्षणावरून संजय राऊतांचा निशाणा

 

नवी दिल्ली | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना मंगळवारी मराठा आरक्षणासंबंधी १२७ व्या घटना दुरुस्तीमध्ये सुधारणा करणारे विधेयक चर्चेनंतर संसदेत बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या विधयकावरून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे केंद्रीयमंत्री नारायण राणे व रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊतांनी संसदेत ज्यावेळी विधेयकावर चर्चा सुरु होती. त्यावेळी राणे व दानवे दोघे गप्प का राहिले? ते का बोलले नाहीत? असा सवाल केला आहे.

मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक दोनतृतीयांश मतांनी मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. मात्र, मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याच्या तरतुदीचा या विधेयकामध्ये समावेश न केल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली जाऊ लागली आहे. यावरून काल झालेल्या चर्चेवेळी केंद्रात सत्ता असलेल्यांचे मंत्री रावसाहेब दानवे व नारायण राणे हेही उपस्थित होते.

मात्र, या चर्चेत महाराष्ट्रातल्या भाजपाच्या खासदारांनी काहीच सहभाग घेतला नाही. यावरून राऊतांनी राणे व दानवे यांच्यावर टीका केली आहे. आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी राज्यभर मोर्चे काढण्यात आले. आंदोलनेही करण्यात आली. मात्र, आता जेव्हा संसदेत या मराठा आरक्षणावरी सुधारित विधेयकावर चर्चा हा करण्यात आली. तेव्हा राज्यातील भाजपमधील नेत्यांनी यात सहभाग घेणे आवश्यक होते. त्यांनी सुद्धा बोलायला हवे होते. ते का बोलले नाहीत? त्यांनी बोलायला हवे होते, असे राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: