सामना अग्रलेखावर आमदार निलेश राणे यांनी ट्विट करून केली टीका !

 

मुंबई | आमदार प्रसाद लाड यांच्या टीकेवर आजच्या सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आले होते. भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना मधील अग्रलेखातून केला आहे.

आता या अग्रलेखावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली असून जुन्या शिवसैनिकांना डावलून शिवसेनेने उपऱ्यांना पक्षात कशी संधी दिलीय, त्याची थोडक्यांत माहिती ट्विटरवरून आ. राणेंनी मांडली आहे. स्वतः पवारांचे लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषणे द्यायची, अशा शब्दांत आ. राणेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे.

शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे. पण थोडी माहितीसाठी… सचिन आहीर – bks ची जबाबदारी, राहुल कनाल – शिर्डी संस्थान, आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था, उदय सामंत – कॅबिनेट मंत्री, अब्दुल सत्तार – मंत्री, प्रियांका चतुर्वेदी- खासदार…यादी मोठी आहे.

इथे कुठेही… डाके.. रावते.. रामदास कदम.. शिवतारे.. राजन साळवी, सुनील शिंदे सारखे जुने सैनिक दिसणार नाहीत.स्वतः पवारांचे लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची!! असं आ. नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: