संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, पण पॅकेज जातं कुठे? असली थोतांडं करणार नाही – मुख्यमंत्री

 

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे तेथील स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरबाधित जिल्ह्यांच्या दौऱ्यावर पोहचले आहेत.

पूरग्रस्त कोकण आणि कोल्हापूरची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीतील पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. तसेच तात्यांच्यांशी संवाद साधत आहे. त्यांच्या समस्यांची माहिती घेऊन त्यांचे सांत्वन करत आहेत. यावेळी संवाद साधताना पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांना टोला हाणला आहे.

संकट आलं की पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. एवढ्या हजार कोटीचं पॅकेज… कुठे जातं कुणालाच माहीत नाही… मला अशी थोतांड येत नाही. मला खोटं बोलता येत नाही जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल. ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिलवडीकरांना दिली.

कोरोनाचं संकट आणि पुराचं संकट या दोन्ही संकटाचा आपण सामना करत आहोत. त्यामुळे अशी गर्दी करू नका. कोरोनाचं संकट आणि कोसळलेलं दु:ख याची मला कल्पना आहे. तुमच्या व्यथा आणि वेदना आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे. ते ते आम्ही करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Team Global News Marathi: