किरीट सोमय्या प्रकरणावरुन छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

 

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता, याप्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी लोकसभा खासदार किरीट सोमय्या हे पुणे पोलिसात तक्रार दाखल करायला दिनांक ५ फेब्रुवारी शनिवार रोजी पुणे शहरात आले होते.

किरीट सोमय्या हे या घोटाळ्या संबंधी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घ्यायला गेले असताना पुणे शहरातील शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना पुणे महानगलिकेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की केली, या धक्काबुक्कीमध्ये किरीट सोमय्या किरकोळ जखमी देखील झाले. हल्ला झाल्यावर किरीट सोमय्या यांनी माझ्यावरचा हल्ला हा उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून झाला आहे असा आरोप केला होता. यावरून महाराष्ट्र राज्यात अनेक आरोप प्रत्यारोप झाले.

आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांना या आरोपासंबंधी पाठिंबा दर्शवला आहे. आज मुंबईमध्ये बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले कि, ” पुणे महापालिकेत जे घडलं, ते अपघातानं घडलं; मुख्यमंत्री असलं काम करत नाही यावर माझा विश्वास आहे. आज उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविताना भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पण टीका केली.

Team Global News Marathi: