महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत होणार सगळे सीसीटीव्ही यंत्रणेत कैद

 

पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेचे बिगुल येत्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये पार पडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन व निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे.निवडणुकीवेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कामकाजावर लक्ष राहावे, यासाठी CCTV यंत्रणा उभारण्यात येणार असून याकामासाठी अंदाजे ८६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचनेचा आराखडा प्रसिद्ध झाला आहे. त्यावर हरकती व सूचना घेऊन २५ फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर आराखडा अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षण सोडत पार पडेल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन प्रत्यक्ष पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. शहरातील ४६ प्रभागांमधून १३९ नगरसेवक निवडण्यात येणार आहे.

शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. निवडणुकीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याकरिता महापालिकेच्या दूरसंचार विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. शंभर कॅमेरे व त्यासाठी लागणारी यंत्रणा घेण्यासाठी महापालिकेने ८९ लाख २८ हजार रुपये खर्च निविदेमध्ये नमूद केला होता.

Team Global News Marathi: