वीज बिलाच्या मुद्द्यावरून भाजपा झाली आक्रमक, अखेर सरकारने घेतला हा निर्णय

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस पार पडत आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाने भरमसाठ वीज बिलाच्या मुद्द्यावरून तसेच वीज तोडणीच्या निर्णयावर आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यात याच मुद्द्यावरून भाजपने आघाडी सरकारला घेरण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. विज बिल भरले जात नसल्याने पुरवठा खंडीत केले जात आहे. याच्या निषेधार्थ भाजपाच्या आमदारांनी आज मंगळवारी विधान भवनासमोर पायर्‍यांवर बसून आंदोलन केले.

दरम्यान वीज बिलांच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होत नाही तोवर राज्यातील शेतकरी व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिलेली आहे. या निर्णयामुळे सर्व सामान्य ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकर्‍यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी विधानसभेत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधीत यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे.

Team Global News Marathi: