‘ज्यांच्या मनात करुणा त्यांना होणार नाही कोरोना, राज्यपाल भगतसिंह यांनी कोणाला लगावला टोला

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. मात्र आता फेब्रुवारी महिन्यात वाढत असलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. याच सरकारने नागरिकांना काही निर्बंध घालून दिले आहेत.

त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना संदर्भात एक वक्तव्य केले आहे. ज्यांच्या मनात करुणा त्यांना होणार नाही कोरोना, असे भगतसिंग कोश्यारी यांनी म्हणाले आहे. १ मार्च रोजी राजभवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. मात्र हा टोला त्यांनी नेमका कोणाला मारला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, दिवसभरात ८ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. लोकांनी कोरोना महामारीचा मोठा धसका घेतला होता. मात्र मी कोरोनाला कधीही घाबरलो नसल्याचंही भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउनच्या काळात मी लोकांना भेटणे सोडले नाही. आता तर राजभवन हे लोकभवन झाले आहे. लोक मला विचारतात तुम्हाला कोरोनाची भिती वाटतं नाही की?, त्यावेळी मी त्यांना ज्यांच्या मनात कोरुणा आहे, त्यांना कोरोना होत नाही, असं उत्तर देतो. तसेच कोरोनाला घाबरु नका तर काळजी घ्या, खबरदारी घ्या, हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करा, असे आवाहनही राज्यपालांनी केले आहे.

Team Global News Marathi: