आमच्या प्रेमकहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्प्यात; हिंदी आणि मराठी भाषेत असेल उपलब्ध

 

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज करुणा शर्मा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्या नावाबाबत तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. दरम्यान अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की, माझ्याकडे सर्व कायदेशीर पुरावे आहेत. धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक पत्नी लपवल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वी आमच्या दोघांवर सिनेमा काढल्यावर तो हिट होईल असे वक्तव्य त्यांनी केले होते.

आज कोल्हापुरात बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, आमच्या प्रेमकहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्प्यात असून त्यातून अनेक पुरावे समोर आणणार आहे. या पुस्तकात २५ वर्षाची आमची कहाणी असणार आहे. यामध्ये पुराव्यांसह लग्नाचे फोटो देखील असतील. हिंदी भाषेत हे पुस्तक लिहून झालं आहे. हिंदी आणि मराठी भाषेत हे पुस्तक असेल.

नावावरुन ऋटी निर्माण होण्याच्या शक्यतेवर बोलताना त्यांनी म्हटलं की, माझ्याकडे जे पेपर आहेत त्याच्या आधारावरच मी फॉर्म देखील भरला आहे. माझ्या कागदपत्रांमध्ये काहीही ऋटी नाहीत. टेक्निकल प्रॉब्लेम तर माझ्या पतीच्या कागदपत्रांमध्ये आहेत. त्यांनी सहा-सहा मुलं लपवली आहेत. अनेक पत्नी लपवल्या आहेत, तो टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. माझ्या फॉर्ममध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. जगाला हे पुरावे दिसतीलच, असं त्यांनी म्हटलं.

Team Global News Marathi: