“नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना”

 

केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा महाविक आघाडीच्या मंत्र्यांपाठोपाठ आता थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि पाटणी रश्मी उद्धव ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका सील करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीधर पाटणकरांच्या कंपनीला कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी दोन डझनहून अधिक कंपन्यांचे संचालक असल्याचे समोर येत आहे. यातच आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. याप्रकरणी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना, नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना, अशी शंका व्यक्त केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. गेल्या वर्षभरापासून ट्विटच्या माध्यमातून नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याविषयी प्रश्न विचारत आहे. चतुर्वेदी नेमके कुठे गेले, त्यांना कोणी गायब केले, हे प्रश्न मी वारंवार विचारले आहेत.

माझी ट्विटस त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली असतील आणि मी काही खोटे बोलत असेल तर त्यांनी माझ्याविरुद्ध कारवाई करावी, , असेही मी म्हटले होते. मात्र, त्यानंतरही नंदकिशोर चतुर्वेदी समोर आली नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: