“. यांच्यावर फडणवीसांनी आरोप केला त्यांच्याच हस्ते सत्कार स्वीकारला”, मिटकरी यांनी शेअर केला व्हिडिओ

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्तधारी आणि विरोधकांमध्ये शीतयुद्ध पेटलेले दिसून येत असून देवेंद्र फडणवीसांनी वक्फ बोर्डावर दाऊदच्या व्यक्तीची नियुक्ती केल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली होती. ठाकरे सरकारने चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केली, असा धक्कादायक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. यावर आता राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

“काल माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात दाउदशी संबंध असल्याचा ज्या डॉक्टर मुदस्सीर लांबे यांच्यावर आरोप केला त्यांच्याच हस्ते सत्कार स्वीकारतानाचा एक व्हिडिओ प्रेक्षकांनी अवश्य बघावा.”, असे ट्वीट मिटकरी यांनी केले आहे. सोबतच त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. तसेच #shameonBJP असेही त्यांनी म्हटले आहे.

तर फडणवीसांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, मुदस्सीर लांबे यांच्याबाबतची तुमच्याकडे असलेली माहिती चुकीची आहे. या व्यक्तिची नेमणूक सरकारने केली नाही. या बाबतची निवडणूक ३० ऑगस्ट २०१९ रोजी पार पडली होती. ते निवडून आलेले सदस्य आहेत. विनाकारण दाऊद दाऊद करू नका. त्यांचा जर दाऊदशी संबंध असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची, त्यांना काढून टाकायचं का याची कारवाई करू, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात म्हटले आहे.

Team Global News Marathi: