कोण आला रे कोण आला…गुवाहाटीचा चोर आला…; शिंदे गटाच्या आमदाराला पाहून राष्ट्रवादीची घोषणा

 

राज्यात खोक्यांच्या मुद्द्यावरून रकरां तापलेले असताना शिंदे गटाला आद्यपही खोक्यावरून खडेबोल विरोधकांचे एकूण घ्यावे लागत आहे अशातच राज्यात ग्रामपंचात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेले असताना आता कुमठे ग्रामपंचायतीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाची सत्ता असून या वेळेस ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या गटाने ही पॅनेल टाकले आहे.

मात्र दुसरीकडेराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत पन्नास खोके…एकदम ओक्के, कोण आला रे कोण आला…गुवाहाटीचा चोर आला, अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव शांत झाला. कोरेगाव तालुक्यातील कुमठे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या ग्रामपंचायतीवर आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाची सत्ता असून या वेळेस ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या गटाने ही पॅनेल टाकले आहे.

कुमठे या गावात दोन्ही बाजूच्या पॅनेलची कोपरा सभा होणार होती. या कारणावरुन राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या सभेसाठी सभेसाठी आमदार महेश शिंदेही तेथे आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके एकदम ओके, कोण आला रे… कोण आला.. गुवाहाटीचा चोर आला… अशी घोषणाबाजी केली.

कुमठे ग्रामपंचायतीत एकूण १५ सदस्य आणि सरपंचपद एक असे १६ उमेदवार असून त्यासाठी दोन्ही बाजूकडून ३२ उमेदवार निवडणूक लढत आहेत. ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपमध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे.

Team Global News Marathi: