चित्रा वाघ यांच्या आडचणीत वाढ, अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला दाखल

 

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर अब्रूनुकसणीचा दावा दाखल केला आहे. चित्रा वाघ 2021 मध्ये मेहबूब शेख यांचा उल्लेख बलात्कारी म्हणून केला होता. त्यावरून मेहबूब शेख यांनी शिरूर पोलीस ठाण्यात चित्रा वाघ यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यावरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

वाघ यांनी आपल्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शेख यांच्याकडून दावा दाखल करण्यात आला होता. मेसबूब शेख यांच्यावर औरंगाबाद येथील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता त्यावरून चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत मेहबूब शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच दरम्यान चित्रा वाघ यांनी बलात्कारी असा उल्लेख केल्याने मेहबूब शेख यांनी बीड न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून चित्रा वाघ यांच्यावर दाखल केलेला अब्रूनुकसानीचा दावा स्वीकृत केला आहे.

शिरूर कासार न्यायालयाने मेहबूब शेख यांचा दावा स्वीकृत केला आहे. मेहबूब शेख यांनी पन्नास लाख रुपयांचा दावा दाखल केला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दाखल केलेला अब्रूनुकसणीचा दावा दाखल केल्यानं वाघ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल केलेला दावा शिरूर कासार न्यायालयाने दावा स्वीकृत केल्याची माहिती समोर आली आहे.

Team Global News Marathi: