ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्राला सतर्क राहण्याच्या सूचना

 

मुंबई |चीन, थायलंड, दक्षिण कोरिया, पूर्वोत्तर भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारला सतर्क राहण्याची सूचना दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. चीन, दक्षिण कोरियासह इतर देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. चीनमधील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आढावा बैठक घेतली.

सध्या संपूर्ण देशात मिझोराममधील काही जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि केरळमध्ये तुलनेने रुग्ण संख्या जास्त असल्याने या राज्यांकडे अधिक लक्ष दिले जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी माध्यमांना दिली. “महाराष्ट्रामध्ये गृह विलगीकरणात रुग्ण राहतात, त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक होत असल्याचे केंद्र सरकारचे निरीक्षण आहे. देशात चौथी लाट येईल किंवा जून महिन्यात रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढेल असा अंदाज बांधला जात आहे.

केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री भारती पवार म्हणाल्या की, कुठल्या आधावर चर्चां होते माहिती नाही, व्हेरिएन्टसारखा बदलतोय त्यावर लक्ष ठेऊन आहोत. पंचसूत्रीचा वापर केल्यास धोका जाणवणार नाही. सण उत्सवाच्या काळात अधिक काळजी घेण्याची गरज ही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच अॅक्टिव्ह सर्व्हिलन्स चालू ठेवा, जिनोम सिक्वेसिंग करा, वेगळी लक्षणे दिसली तर लगेच यंत्रणांना कळवा, टेस्टिंग, ट्रीटमेंट, लसीकरणावर भर देतानाच बाहेरच्या देशातील एखादा रुग्ण आढळल्यास रुग्णाची जिनोम सिक्वेसिंग करण्याच्याही सूचना देण्यात आल्या असल्याचं भारती पवार यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: