ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १ वाजता महापौर किशोरी पेडणेकर विमानतळावर!

 

मुंबई | ओमायक्रॉन विषाणूसंदर्भात पूर्वतयारीच्या अनुषंगाने राज्य सरकार सक्रिय झले असून याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अॅड.
सुहास वाडकर यांनी चक्क आज मध्यरात्री १ वाजता अंधेरी (पूर्व) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कशा पद्धतीने तपासणी करण्यात येते, याची पाहणी करून काही निर्देश दिले.

कोरोना विषाणूचा अत्यंत वेगाने पसरणारा नवीन प्रकार काही आफ्रिकन देशांमध्ये आढळला असून त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. ते पाहता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने आपापल्या स्तरावर आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी असा सूचना महापौर पेडणेकर यांनी विमानतळ प्रशासनाला दिल्या आहेत

तसेच ज्या आफ्रिकन देशांमध्ये नवीन कोविड विषाणू आढळला आहे, तेथून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत आला तर, त्यांचे पासपोर्ट काटेकोरपणे तपासावे, अशा विविध सूचना महापौरांनी यावेळी विमानतळ प्रशासनाला दिल्या आहे. सध्या महाराष्ट्रात दक्षिण आफ्रिकेतून १०० प्रवाशी महाराष्ट्र आले असल्याची धक्कादायक माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलीय होती. या माहितीनंतर राज्य सरकार तसेच मुंबई मनपा सक्रिय झले आहे.

Team Global News Marathi: