ओम सर्वांसमोर देणार स्विटूवर प्रेम असल्याची कबुली! हे ऐकून मालविकाला बसनार धक्का

मुंबई । अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत एक नवीनच ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत ओम आपले स्विटूवर प्रेम असल्याची कबुली देणार आहे. त्यामुळे आता स्विटू यावर काय प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

स्विटू आणि मोहितचा साखरपुड्याचा मुहुर्त आता जवळ येत आहे. त्यामुळे ओमने अंबरनाथलाच स्विटूच्या घरी थान मांडले आहे. दरम्यान, स्विटूचा साखरपुडा पार पडत असताना, स्विटूचे सगळे लक्ष हे ओमकडे असते. हे पाहून मोहित मात्र फार संतापतो व अवनी माझ्यावर प्रेम नाही असे म्हणतो. व तिच्या मनात आणखी कोणीतरी असल्याचे म्हणतो.

त्यामुळे साखरपुड्यात चाललेला हा सगळा प्रकार पाहून ओम देखिल मोहितवर संतापतो व स्विटू चांगली मैत्रिण असल्याचे सगळ्यांना सांगतो. व याशिवाय त्यांच स्विटूवर प्रेम असल्याचेही तो सगळ्यांसमोर मान्य करतो. त्यामुळे आता मालविका आणि नलू या लग्नाला परवानगी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Team Global: