“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर नारायण राणे यांचे गंभीर आरोप”

 

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांची मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यात सलग नऊ तास चौकशी करण्यात आली.दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दोघांची चौकशी करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर नारायण राणेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केले. तसेच राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.दिशा सालियन यांच्या आईने आमच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आम्हाला चौकशीसाठी बोलावले.

महापौर किशोरी पेडणेकर या दिशा सालियन यांच्या आईला जाऊन भेटल्या, असा दावा नारायण राणेंनी केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात; असा असेल संपूर्ण दौरा दिशाबाबत जे काही मी आणि नितेश पत्रकार परिषदेत बोललो होतो. तिचे खरे आरोपी पकडले पाहिजेत.तिने आत्महत्या केली नसून ती हत्या आहे, असं मी वारंवार बोलत होतो. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या दिशाच्या आईकडे गेल्या. त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. आईला खोटी तक्रार करायला लावली, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.आमची दिशा सालियनसाठी न्याय मिळवण्याची मागणी असताना तिची आई म्हणते बदनामी होते.

अशी खोटी तक्रार पोलीस ठाण्याला दिली. पोलीस ठाण्याने ती केस घेतली आणि आम्हाला बसवलं. आम्ही ९ तास पोलीस ठाण्यात होतो, असं नारायण राणे यांनी सांगितलं. मला ९ तास बसवून घेतलं.मी सांगतोय मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहे. आम्हाला अधिकार आहे कुणावर अन्याय होत असेल तर न्याय मिळवून द्यावा. आम्ही दिशाला न्याय देण्याची मागणी करत आहोत. आम्ही अटकपूर्व जामीन घेतला.शेवटी मी अमित शहांना फोन केला. त्यानंतर माझा आणि नितेशचा जबाब घेतला आणि त्यानंतर आम्हाला सोडलं, असं नारायण राणे म्हणालेत.

Team Global News Marathi: