चंद्रकांत पाटील सज्जन, निरागस आहेत पण त्यांनी… संजय राऊतांचा टोला

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांच्यात वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते. अशातच आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊतांनी चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत. निरागस आहेत. पण त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. डॉक्टर लहाने यांचं पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का हे पाहावं लागेल, अशी टीका त्यांनी केली आहे.

भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय आहे काय? चीन आतमध्ये घुसत आहे. यावर भाजपनं बोलावं सीमेवर गंभीर परिस्थिती आहे, असं ते म्हणाले. तसेच कालच्या पंतप्रधानांच्या बैठकीला ज्यांच्याकडे सूत्र आहेत ते आरोग्यमंत्री उपस्थित होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता या टीकेला चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: