देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करा! आशिष शेलार यांची मागणी

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्त केला. सरकारने विरोधकांना संपवण्याचा कट रचला असून यात सरकारी वकिलांची मदत घेतली गेली होती. स्वत: सरकारी वकिलांनी याची माहिती दिली असून याचे व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हिताचा लाव रे तो व्हिडिओ काय असतो हे दाखवून दिलं आहे, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. तसंत देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने वाढ करावी, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे अशी मागणी शेलार यांनी केली आहे. तसेच सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांना कोण भेटतं, यावर लक्ष ठेवलं पाहिजे, अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.

विधान भवनाच्या पायवर भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकार आणि शरद पवारांविरोधातही भाजप आमदारांनी घोषणा दिल्या. विरोधकांविरोधातील व्हिडिओ समोर आल्यानंतर कट रचणाऱ्या मोठ्या साहेबांचा धिक्कार असो अशा घोषणा भाजप आमदारांनी दिल्या. यासोबतच व्हिडिओत दिसणारे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची हकालपट्टी करण्याची मागणी भाजपने केली .

Team Global News Marathi: