रशिया सोडून जाणाऱ्या कंपन्यांची संपत्ती जप्त होणार? पुनीत यांचा मोठा निर्णय

 

युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर रशिया अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांच्या निशाण्यावर आहे. रशियाविरुद्ध एकानंतर एक अनेक आर्थिक निर्बंध लावण्यात आले आहेत. अमेरिकेने नुकतेच रशियन तेल आणि गॅसवरही निर्बंध लावले आहेत. युक्रेनवरील हल्ल्यानंतर 100 हून अधिक अमेरिकन आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रशियातील आपला व्यवसाय गुंडाळला आहे.

 

विमान निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांपासून ते फेसबुक आणि गुगल सारख्या टेक कंपन्यांचाही समावेश आहे. मात्र, आता रशिया याचा सामना करण्याची आणि पलटवार करण्याची तयारी करत आहे. यासाठी रशियातील ज्या कंपन्यांनी आपला व्यवसाय बंद केला आहे, त्यांचे कारखाने आणि इतर मालमत्तांचे राष्ट्रीयीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या ‘यूनाइटेड रशिया पार्टी’चे जनरल काउंसिलचे सेक्रेटरी आंद्रेइ तुर्चक यांनी दोन दिवसांपूर्वीच यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, युक्रेनवरील हल्ल्यानंतर, पश्चिमेकडील ज्या कंपन्या रशिया सोडून जात आहेत, त्यांच्या संपूर्ण ऑपरेशनचे राष्ट्रीयीकरण करणे आवश्यक आहे. असे केल्यास लोकांच्या नोकऱ्याही वाचतील आणि रशिया देशातच सामान बनविण्यातही सक्षम राहील.

Team Global News Marathi: