चंद्रकांत पाटलांच्या ‘या’ नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

 

मुंबई | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अन माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलांनी मोठा दावा केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी ईडीच्या कारवाया होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही महाविकास आघाडीच्या अनेक घोटाळेबाज नेत्यांची यादी जाहीर केली आहे.

तसेच अनेक नेत्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ज्या दिवशी ९3 च्या बॉम्बस्फोटांनंतर नेमलेल्या समितीचा अहवाल बाहेर येईल, त्यादिवशी अनेकांना तोंड दाखवण्याचीही जागा उरणार नाही. तसेच तुरुंगातही त्यांच्यासाठी जागा उरणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. बुधवारी पहाटे 5 वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले होते. त्यानंतर ७ वाजल्यापासून नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरु होती. 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं मलिकांना अटक केली. मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. ईडीने मलिकांना विशेष कोर्टासमोर हजर केलं आहे. तेव्हा कोर्टाने नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

Team Global News Marathi: