मुंबई | कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले.
त्यांच्या या वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाने लक्ष घातले आहे.
महिलाबद्दल बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्या बद्दल सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन या बाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. साताऱ्यात व्यसनमुक्ती संस्थेच्या आंदोलनात ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकरांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केले. मात्र हे वक्तव्य त्यांना भोगवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करीत पोलिसांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.