“ओबीसींनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी पुढे येऊन लढा “

 

ओबीसींना आपल्या हक्कासाठी पुढे येऊन लढण्याचा आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. “महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपली दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांची बांधिलकी जपून आपण कुठलीही अंधश्रद्धा पाळू नये. राजकारण, समाजकारणात पुढे जाण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्या शाळा आहे. त्यामुळे आपल्या दैवतांच्या विचारसरणीनुसार काम करून समाजकारण, राजकारणात ओबीसी बांधवांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे,” असे आवाहन छगन भुजबळ यांनी राज्यभरातील ओबीसी बांधवाना केले. भुजबळ लातूर येथे आयोजित ‘ओबीसी आरक्षण बचाव जागर मेळाव्यात’ बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यामुळे राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर ओबीसींना शिक्षण, राजकारण, नोकरी यामध्ये आरक्षण देण्यात आले. मात्र ओबीसींच्या विरुद्ध अनेक वेगवेगळ्या दृश्य आणि अदृश्य शक्ती काम करत आहे.

यातूनच कोर्टात ओबीसी आरक्षणाला आव्हाने देतात त्यातून अडचणीत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रकार आजचा नाही तर वारंवार असे प्रकार घडतात. त्याला आपण आजवर तोंड देत मार्ग काढत आलो आहोत. आता परत कोर्टाचा निर्णय आला. त्यानुसार शिक्षण आणि नोकरी नाही मात्र राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

“या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ते महापौर पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत सुमारे 56 हजार जागांवर गदा आली. यामुळे आपण सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्यास स्थगिती देण्याबाबत मागणी केली होती त्यानुसार निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. आपण पुन्हा एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करत आहोत त्यानुसार केंद्र सरकारने इपिरियल डेटा राज्य शासनास देण्यात यावा अशी मागणी करत आहोत. कोरोना कालावधी असतांना हा डाटा गोळा करणे राज्य शासनाला शक्य नाही,” असंही यावेळी त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: