ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपा आक्रमक, आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन |

 

मुंबई | ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळावी या मागणीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करावी अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच या मुद्द्यावर राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपा तर्फे आज २६ जून रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

ओबीसी समाजाच्या हक्कांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपाकडून शनिवारी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी राज्यातील विविध भागात प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये चक्का जाम करण्यात येणार आहे.

विविध नेते विविध ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरातून नेतृत्व करतील तर, रावसाहेब दानवे जालनातून आंदोलन करणार आहे. तर पंकजा मुंडे पुण्यातून आंदोलनात सहभागी होतील. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा घेत थेट ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली होती.

Team Global News Marathi: