‘बघून घेऊ…’, अनिल देशमुखांवर करण्यात आलेल्या ED कारवाईवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया |

 

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागूपर आणि मुंबईतील निवासस्थानावर काल ईडीने छापा होता. ईडीने चार तास त्यांच्या घराची झाडाझडती घेतली होती. तसेच देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना अर्थात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. या कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. आता या कारवाईवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देण्याचं हे काही नवं प्रकरण नाही. काल शरद पवार देखील याबाबत बोलले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार असोत किंवा मग शिवसेनेचे सर्वांना विनाकारण त्रास दिला जात आहे. पण महाविकास आघाडी भक्कम आहे. आम्ही बघून घेऊ असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात भाजपाला पर्याय देणारी भक्कम आघाडी निर्माण करायची असेल तर काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय कोणतीही आघाडी पूर्ण होऊ शकत नाही, असं विधान मी याआधीही केलं होतं. शरद पवार यांनीही आता तीच भावना व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष देशातील मोठा पक्ष आहे. भाजपाला आव्हान निर्माण करायचं असेल तर काँग्रेसला सोबत घेऊनच आघाडी तयार होऊ शकेल असे संजय राऊत म्हणाले होते.

Team Global News Marathi: