ओबीसी आरक्षणासह इतर मागण्यांवरुन राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक !

 

आरक्षणाच्या प्रश्नासह विविध मागण्यांच्या मुद्यांवरुन राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झाला आहे. या मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं येत्या 5 ऑगस्टला दिल्लीत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरुन या मोर्चाला सुरुवात होणार आहे. संसदेवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येमार आहे.

विविध मुद्यावरुन राष्ट्रीय समाज पक्ष चांगलाच आक्रम झाल्याचे दिसत आहे. विविध मागण्यांसाठी 5 ऑगस्टला दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे. जातनिहाय जनगणना करणे, ओबीस आरक्षण कायम करणे, मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात संपुर्ण देशातून लोक सहभागी होणार आहेत.

या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बारामती मधून देखील मोठ्या प्रमाणावर लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांनी दिली आहे. मोठ्या संख्येनं नागरिकांनी या मोर्चात सामील व्हावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

आपल्या विविध मागण्यांवरुन राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झाला आहे. संसदेवर हा मोर्चा काडम्यात येणार आहे. त्यामुळं मोठ्या संख्यनं नागरिकांना या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्यामुळं आता या मोर्चाला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि सरकार या मोर्चावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Team Global News Marathi: