‘ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ‘मविआ’मध्ये वाद, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा महविकास आघडीमध्ये वाद होण्याचे चिन्ह दिसून येत असून नाना पटोले यांनी थेट आघाडीला खडेबोल सुनावले आहे. मध्य प्रदेशनं ओबीसी राजकीय आरक्षण टिकवून दाखवलं तर महाराष्ट्राची गाडी अहवालावरच अडकून पडली आहे. विरोधकांनी याच मुद्यावरुन सरकारला घेरलं असताना आता काँग्रेसनेच आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. काँग्रेसच्या ओबीसी विभागातर्फे राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केलीय. याच दरम्यान आज मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत मविआमधील धुसफूसीवर खलबतं होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात सत्तेत असूनही काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

मुंबई ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याची गंभीर दखल घेऊन नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. महाराष्ट्रातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही, असे या पत्रात म्हटलं आहे.

Team Global News Marathi: