मेधा किरीट सोमय्या यांचा संजय राऊतांविरोधात हायकोर्टात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल

 

मुंबई | भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात १०० कोटींचा दिवाणी मानहानीचा दावा दाखल केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

खासदार संजय राऊत यांनी १०० कोटींच्या शौचालय घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप केला आहे. शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बांधकामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

माध्यमांसमोर केलेले वक्तव्य बदनामीकारक असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी ही विधाने करण्यात आली आहेत. मेधा सोमय्या यांनी यासंदर्भात संजय राऊत यांना नोटीस बजावण्याची विनंती केली. संजय राऊत यांच्यावर मानहानीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Team Global News Marathi: