औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’-देवेंद्र फडणवीस

औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’-देवेंद्र फडणवीस

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी शिवसेना अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहे. तसेच शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत याविषयावर बोलून सुद्धा दाखविले होते. मात्र याच नामांतरावरून आघाडी सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.

हाच मुद्दा पकडत विरोधी पक्षनेते आणि माजी महसूल मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि काँग्रेसला टोला लगावला आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे असे फडणवीसांनी म्हणतं दोन्ही पक्षाला चिमटा काढला आहे.

यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळेच शिवसेनेने पुन्हा एकदा नामांतराचा विषय समोर आणला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने औरंगाबादच्या संभाजीनगर या नामकरणाला विरोध केला काय किंवा नाही केला काय? शिवसेनेला हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता हवा असतो. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: