अजित पवार आणि फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ

अजित पवार आणि फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ

पुण्यातील विविध विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते. नुकतेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झालं.

मात्र सदर कार्यक्रम सुरु असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यक्रमासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. हा कार्यक्रम सुरु असताना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली गेली.

भाजपकडून जय श्री रामची घोषणा देण्यात येत होती. त्यानंतर राष्ट्रवादीने चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला. यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामनेही भिडले. यानंतर प्रसारमाध्यमांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. तर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, असे सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: