‘या ‘मराठी अभिनेत्रीचे कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट, पाहा फोटो

‘या ‘मराठी अभिनेत्रीचे कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट, पाहा फोटो

 

2019 मध्ये आलेल्या कबीर सिंग या ब्लॉकबस्टर सिनेमात एक मराठमोळी अभिनेत्री झळकली होती. या अभिनेत्रीने कबीर सिंगमध्ये मोलकरणीची एक छोटीशी भूमिका केलेली मात्र तिचा रोल इतका जबरदस्त होता की तिने अनेकांचे लक्ष वेधले. तिच्या अभिनयाची जबरदस्त चर्चा झाली होती.

वनिता खरात असे त्या अभिनेत्रीचे नाव असून 2021 च्या पहिल्याच दिवशी वनिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वनिताने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्या फोटोने एकच खळबळ माजली आहे. वनिताने तिचा न्यूड फोटो शेअर केला आहे. वनिता शरीरयष्टी स्थूल आहे. त्यामुळे तिने हे फोटोशूट करून बॉडि शेम करणाऱ्यांना संदेश दिला आहे.

‘मला माझ्यातील टॅलेंटचा, माझ्यातील प्रतिभेचा, आत्मविश्वासाचा अभिमान आहे. तसंच मला माझ्या शरीराचा देखील अभिमान आहे. कारण मी ‘मी’ आहे’, अशी पोस्ट वनिताने शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने #BodyPositivity असा हॅशटॅग वापरला आहे.

 

‘वनिताने एका कॅलेंडर साठी हे बोल्ड फोटोशूट केले असून तिच्या या पोस्टला हजारो लाईक मिळाले आहेत. तसेच अनेक कलाकारांनी तिच्या पोस्टला पाठिंबा देखील दर्शवला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: