आता होणार भाजपच्या आयटी सेलची चौकशी

गायिका लता मंगेशकर या भारताच्या दैवत असून जगभरातील क्रिकेटप्रेमी सचिन तेंडुलकरचे चाहते आहेत. त्यांच्या ट्वीटची चौकशी करू, असे वक्तव्य मी केले नव्हते तर, भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्यासंदर्भात मी बोललो होतो. तसेच माया अबोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आलेला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे.

कोरोनातून बरे झाल्यावर घरी आल्यावर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते. सेलिब्रीटी ट्वीटच्या बाबतीत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर या आपल्या दैवत असून सचिन तेंडुलकर यांनाही देशभरात मानले जाते. त्यांनी केलेल्या ट्वीटची चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

तसेच टमागे भाजपच्या आयटी सेलची काय भूमिका आहे, हे तपासण्यासाठी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीनुसार भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख व इतर १२ जणांचा यात समावेश असल्याचे दिसून येत आहे. सखोल चौकशी सुरू आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Team Global News Marathi: