आता हे नवीनच: मोहिते पाटलांच्या नातवाकडून ‘या’ नव्या आघाडीची स्थापना, राजकारणात खळबळ

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात विजयसिंह मोहिते पाटलांच्या नातवाची एन्ट्री; ‘या’ नव्या पक्षाची स्थापना, राजकारणात खळबळ

अकलूज(प्रतिनिधी) ; सोलापूर जिल्ह्यातील राजकारणावर मागील अनेक वर्षे अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. पण गेल्या पाच वर्षात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक उलाढाली झाल्या व माजी उपमुख्यमंत्री असणाऱ्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वर्चस्वाला हादरा बसला. त्यात त्यांचा स्वतःचा विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने ते पुरते हतबल झाले आहेत. त्यातच त्यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव त्यांना मोठा धक्का बसला.

 

पण पुढे राजकीय समीकरणे बदलत त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला व भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेवरील आमदार झाले. सध्या ते भाजपचे विधानपरिषद आमदार असले तरी रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विश्वतेजसिंहमोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोहिते-पाटील परिवाराने “कृष्णा-भीमा विकास आघाडी” या नावाने नव्या पक्षाची स्थापन केली आहे. या नव्या पक्षाची रितसर नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

 

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याकंडून पक्ष नोंदणीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.

विश्वतेजसिंह हे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव आहेत. जिल्हा राजकारणातील त्यांचे ‘लॉंचिंग’ या निमित्ताने करण्याते येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेऊन या आघाडीची स्थापना करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. मोहिते-पाटलांच्या या नव्या राजकीय भूमिकेने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीआधी मोहिते-पाटील परिवारातील रणजतिसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या सर्व बंधूंनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. मोठ्या हिमतीने रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना खासदार म्हणून निवडून आणले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या राम सातपुते या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला आमदार म्हणून निवडून आणले.

 

 

मोहिते-पाटलांचा सारा परिवार भाजपात असताना मोहिते-पाटील यांना नव्या आघाडीची गरज का भासत आहे. याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: