देशात कोरोनाचा उद्रेक सुरूच; मागील 24 तासात 68 हजारापेक्षा जादा कोरोना रुग्णांची वाढ

नवी दिल्ली :  गेल्या  24 तासांत देशभरातून कोरोनाचे  68,000 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांच्या नवीन आकडेवारीनुसार, देशातील संक्रमणाची एकूण संख्या आता 1,20,39,644 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, कोरोनाहून एका दिवसात 200 हून अधिक लोकांचे प्राण गमावले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसच्या बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. देशात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या 5,21,808 वर पोहोचली आहे. निरोगी होण्याचे प्रमाण 94.58 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाची नवीन प्रकरणे 68,020 होती. यावेळी कोरोनाच्या संसर्गामुळे 312 जणांना आपला जीव गमवावा लागला. या नव्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या आता वाढून 1,61,843 झाली आहे. आतापर्यंत 1,13,55,993 लोक या संसर्गापासून बरे झाले आहेत आणि घरी परत आले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामधून 291 लोकांचा मृत्यू झाला. यावेळी, कोरोना पासून 32,231 लोक बरे झाले आणि त्यांना घऱी सोडण्यात आले.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रम जलद सुरू आहे. आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 6,05,30,435 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: