…..आता खुद्द आरोग्य मंत्री म्हणाल्या मुख्यमंत्री महोदय मंदिराचे दार उघडा !

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने घंटानाद अंदोलन करून ठाकरे सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अद्यापही कोरोनाचे कारण देत ठाकरे सरकारने मंदिराची दारे बंद ठेवलेली आहे. मात्र आता खुद्द केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याने मंदिराचे दार उघडण्याची विनंती केली आहे. मोदी यांच्यामंत्रिमंडळातील केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीच मुख्यंमंत्र्यांकडे मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात कोविड नियमांचे पालन करून भक्तांसाठी मंदिर उघडायला हवीत. नागरिक नियम पाळत आहे. उद्धवजींनी आता मंदिरं उघडायला हवीत, असं मतं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यक्त केली. तसंच ही मागणी करताना त्यांनी वाढलेल्या लसीकरणाचा टक्का देखील अधोरेकित केला.

देशात लसीकरणात ७५ कोटींचा आकडा पार केलाय. हे सरकारचे यश आहे. पुढच्या काळात हा आकडा आणखीन वाढेल. देशभरातही मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. त्याचबद्दल डब्लू. एच. ओ. ने कौतुक करणं हा भारताचा गौरव आहे, असंही भारती पवार म्हणाल्या. देशात वारंवार तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

याचविषयावर बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या, तिसरी लाट येऊ नये म्हणून शासनस्तरावर प्रयत्न होतोय. मास्क वापरायला हवा. नागरिकांनी नियम पाळायला हवेत, नागरिकांनी कोरोनाच्या बाबतीत सतर्क राहायला हवे. महाराष्ट्रात कोविड नियमांचे पालन करून मंदिर दर्शनासाठी उघडायला हवी, असं त्या म्हणाल्या.

Team Global News Marathi: