आता संजय गायकवाडांनी घेतला आमदार नितेश राणे यांचा समाचार, दिली “बेडकाची” उपमा !

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर संपूर्ण भारतीय जनता पक्ष आमदार गायकवाड यांचयव्हर तुटून पडला होता. त्यात सतत शिवसेनेवर टीका करणारे आमदार नितेश राणे यांनी सुद्धा संजय गायकवाड यांना लक्ष करून मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. आता राणे यांच्या टीकेला संजय गायकवाड यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून पहिला प्रयोग तुझ्या मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू’ अशी उपरोक्त टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर उत्तर देत संजय गायकवाड यांनी नितेश राणेंची यांची तुलना थेट बेंडकाशी केली.

मी काय टीका केली आणि नारायण राणे यांचा बेंडुक नितेश राणे याने टीका केली. या कोंबड्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची मग आम्ही काय त्यांची पूजा करायची. तुम्ही मुख्यमंत्र्यांना काम करू देत नाही, खालच्या पातळीवर टीका करता, मी याबद्दल बोलण्यासाठी नितेश राणेंना फोनही केला होता, मात्र बोलणे झाले नाही. त्यांना ट्वीट करूनच उत्तर देणार आहे असे बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: