राज्यात सोमवारी 59 हजार कोरोना बधितांची भर तर 52 हजार जण झाले बरे

मुंबई -राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यात १५ दिवसांचे निर्बंध लागू केले असूनही होणारी रुग्णवाढ महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ५८ हजार ९२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे.
राज्यात नव्या 58 हजार 924 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात एकाच दिवसात 52 हजार 412 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. राज्याला कोरोनाचा विळखा बसलाय आहे. राज्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. राज्यात औषध आणि ऑक्सिजनचा तुटवाढ भासत आहे. त्यातच वाढणारी रुग्ण संख्या ही चिंतेचा विषय बनली आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती –

राज्यात 52हजार 412 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 31लाख 59हजार 240रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. राज्यात नव्या 58 हजार 924 रुग्णांची नोंद झाली आहे.राज्यात 24 तासांत 315 रुग्णांचा म्रुत्यु झाला असून मृत्यूदर 1.58 टक्के एवढा आहे.
राज्यात एकूण 38लाख 98हजार 262 रुग्णांची नोंद झालीय.
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 76हजार 520 इतकी झालीय.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 7381
ठाणे- 1,200
ठाणे मनपा- 1,335
नवी मुंबई-879
कल्याण डोंबिवली- 1,640
उल्हासनगर-149
मीराभाईंदर-591
पालघर-358
वसई विरार मनपा-769
रायगड-689
पनवेल मनपा-549
नाशिक-1,411
नाशिक मनपा-2,404
अहमदनगर-2,241
अहमदनगर मनपा-860
धुळे- 137
जळगाव-624
जळगाव मनपा-109
नंदुरबार-364
पुणे- 2691
पुणे मनपा- 4,616
पिंपरी चिंचवड- 2,252
सोलापूर- 748
सोलापूर मनपा-191
सातारा – 1,175
कोल्हापुर-555
कोल्हापूर मनपा-182
सांगली- 698
सिंधुदुर्ग-159
रत्नागिरी-261
औरंगाबाद-732
औरंगाबाद मनपा-656
जालना-806
हिंगोली-318
परभणी -331
परभणी मनपा-304
लातूर 966
लातूर मनपा-433
उस्मानाबाद-605
बीड -1157
नांदेड मनपा-461
नांदेड-922
अकोला मनपा-455
अमरावती मनपा-188
अमरावती 304
यवतमाळ-549
वाशिम – 337
नागपूर- 1,661
नागपूर मनपा-5086
वर्धा-756
भंडारा-824
गोंदिया-505
चंद्रपुर-1492
चंद्रपूर मनपा-805
गडचिरोली-374

ग्लोबल न्युज नेटवर्क: