“आता जीव गेला तरी चालेल पण भाजपला सोडणार नाही”

 

राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने मोठा झटका देत ताब्यात घेतलं आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बुधवारी ही मोठी कारवाई केली आहे. मलिक यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीतून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. तर भाजपने ईडीच्या कारवाईला समर्थन दर्शवलं आहे.

राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ही अटक बेकायदेशीर आहे, अनिल देशमुखांनाही असंच फसवलं पण शेवटी काहीच साध्य झालं नाही. यातूनही होणार नाही. कितीही त्रास द्या, आता जीव गेला तरी चालेल पण भाजपला सोडणार नाही, असा थेट इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

दरम्यान, तब्बल साडेसात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाने मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या कारवाईनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच आज सकाळची मोदी सरकार विरोधात महाविकास आघाडीचे मंत्रालयाच्या शेतकरी आंदोलन सुद्धा केले होते.

Team Global News Marathi: