कपाळावरील पिंपल्स घालवण्यासाठी हे उपाय करून पाहा; घरच्या-घरी दिसेल जबरदस्त परिणाम

 

चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या खूप सामान्य बनली आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या, हिवाळ्याच्या दिवसात तर अनेक जणांना याचा त्रास सहन करावा लागतो.तेलकट त्वचेच्या लोकांना इतर लोकांपेक्षा या समस्येचा जास्त सामना करावा लागतो. पिंपल्स घालवण्यासाठी लोक विविध उत्पादने आणि पद्धती वापरतात, परंतु ही समस्या सहजासहजी कमी होत नाही. काही लोकांना फक्त कपाळावर जास्त मुरुमे येत असतात. यामागे धूळ-माती आणि चुकीचा आहार हेही कारण असू शकते, पण त्याकडेही दुर्लक्ष करणं योग्य नाही.

कपाळावरील पिंपल्स घालवण्यासाठी या घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया.

दालचिनी : अन्न पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरली जाणारी दालचिनी त्वचेच्या विविध समस्यांवरही फायदेशीर ठरते. यासाठी दालचिनी पावडर घ्या आणि त्यात थोडा मध घाला.आता ही पेस्ट कपाळावरील पिंपल्सवर लावा. असे काही दिवस सतत केल्याने त्रास कमी होईल.

रात्रीच्या वेळी कोरफडीचा गर लावा : त्वचेच्या अनेक समस्यांसाठी कोरफड वापरली जाते. कोरफडीचा वापर केल्यानं कपाळावरील पिंपल्स दूर होतात.यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पिंपल्सवर मॅश केलेले एलोवेरा जेल लावा. काही वेळाने नॉर्मन पाण्याने स्वच्छ करा.

ग्रीन टी टोनर : त्वचा निरोगी आणि फ्रेश वाटण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी टोनर लावणे उत्तम मानले जाते. तुम्ही घरच्या घरी ग्रीन टीपासून टोनर बनवू शकता.यासाठी ग्रीन टी पावडर घेऊन त्यात गुलाबजल मिसळून स्प्रे बॉटलमध्ये साठवा. याचा नियमित वापर फायदेशीर ठरू शकतो.

एक्सफोलिएट करू नका : कपाळावरील पिंपल्स घासणे किंवा दाबण्याची चूक अजिबात करू नका. असं केल्यानं त्रास आणखीन वाढतो आणि त्यामुळे पिंपल्स देखील पसरतात.

Team Global News Marathi: