शिर्डीत साई दर्शनासाठी ‘हे’ आहेत नवी नियम

 

नगर | राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या दीड वर्षांपासून राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. मात्र कोरोना संसर्गाचा धोका कमी होत असल्यामुळे राज्य सरकारने येत्या ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व मंदिरे नियमांचे पालन करून उघडण्याची अनुमती राज्य सरकारने दिलेली आहे. त्याचप्रमाणे साईतील शिर्डी मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी आता भक्तांना ऑनलाईन नोंदणी करावी लागले. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना एक पास जारी करण्यात येईल. हा पास जवळ असेल, तर मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी साई मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणेबाबत शिर्डीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत गर्दी वाढून संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या दरम्यान प्रवेशासाठी नियमांत फेरबदल केले आहेत. त्यामध्ये कोरोना काळात शिर्डीत गर्दी होऊ नये यासाठी आता साई भक्तांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आदेश दिले आहेत.

दर्शनासाठी ही आहे नवी नियमावली

१)१५ हजार भक्तांनाच केवळ ऑनलाइन दर्शन पास
२)शिर्डीत येताना ऑनलाइन दर्शन आणि आरती बुकिंग करूनच यावे लागणार आहे.
३)sai.org.in या संस्थानच्या वेबसाईटवर मिळणार ऑनलाईन पास मिळणार आहे.
४) दहा हजार भाविकांना मोफत तर पाच हजार भाविकांना सशुल्क ऑनलाईन पास मिळणार आहे.
५)साई प्रसादालय बंद असतील.
६)शिर्डीतील रेस्टॉरंट आणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय रात्री ८.३० नंतर बंद राहणार आहेत.

Team Global News Marathi: