“अब अनिल परब का नंबर भी आयेगा” भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या नव्या ट्विट वरून राजकीय चर्चेत उधाण

 

मुंबई | सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं चित्र दिसत आहे. किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारवर नवनवी आरोपांच्या फेऱ्या झडताना दिसुन येत आहेत. तसेच, उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार असल्याचं वक्तव्यही काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केलं होतं.

तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह अनिल परब, किशोरी पेडणेकर यांसारख्या शिवसेना नेत्यांवरही किरीट सोमय्यांनी घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. अशातच आता किरीट सोमय्यांनी आणखी एक नवं ट्वीट केलं आहे. या ट्वीटची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या ट्वीटमध्ये म्हणालेत की, “आत्ता अनिल परब चाही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा… चौकशी होणार. भारत सरकारनं दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे. ३० मार्च रोजी सुनावणी होणार” या आशयासह सोमय्यांनी रिसॉर्टचे दोन फोटोही शेअर केले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचं रिसॉर्ट आणि बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. त्यावेळी सोमय्या म्हणाले होते की, “मुरुड गावात उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे. अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्याचा जवळील भव्य बंगल्यावर कारवाई येत्या काही दिवसांत होणार आहे.

 

Team Global News Marathi: