“नोटीस देणं अशी परिस्थिती आपल्या देशात कधीच नव्हती”

 

पुणे | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या या नोटीसवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देत खास सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले, नोटीस देणं अशी परिस्थिती आपल्या देशात कधीच नव्हती. वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं असं नव्हतं.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, मी देशाच्या पंतप्रधानांच्यासमोर देखील त्याच्या संदर्भात थोडफार वक्तव्य केलं होतं.प्रत्येकाने आप-आपलं काम करावं. जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे, लोकशाहीत जनता ज्यांच्या पाठिशी आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे. जबाबदार व्यक्तीने कसं काम केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं सर्वांना सोबत घेऊन गेलं पाहिजे हे सर्व स्तरावर जर झालं… लोकांना एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात काहीही रस नाहीये.

नागरिकांचे प्रश्न सुटावेत. पण हे प्रश्न राहतात बाजूला आणि कुणीतरी काही वक्तव्य करतं तर कुणी नोटीस पाठवतं. यामध्ये वेळ घालवू नका आणि विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असंही अजित पवार म्हणाले. अजित पवारांचा १२ तासांचा मॅरेथॉन दौरा, ३१ प्रकल्पांचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात बारा तासांचा मॅरेथॉन दौरा करत आहेत.या बारा तासात ते १७ ठिकाणी जातील आणि ३१ प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत संपत १४ मार्च रोजी संपत असल्यामुळे एकाच दिवशी कार्यकर्त्यांना उद्घाटनासाठी वेळ देत सकाळी ७ पासून उद्घाटनाचा धडाका सुरू केला आहे. मुदत संपल्यावर परत उद्घाटन करता येणार नसल्याने अजित पवारांचा उद्घाटनाचा मॅरेथॉन दौरा आयोजित करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: