भाविकांसाठी खुशखबर | कोल्हापुरात अंबाबाई, ज्योतिबाचं थेट दर्शन; ई पासची गरज नाही !

 

कोल्हापूर | राज्यभरातल्या भाविकांसाठी एक खूशखबर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं जवळपास सगळ्याच गोष्टी खुल्या करण्यात आल्या आहेत. आता राज्यभरातल्या प्रसिद्ध देवस्थानांनी देखील ई-पासची सक्ती रद्द करत भक्तांना थेट देवाचं दर्शन घेण्याची मुभा दिली आहे.

कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई आणि वाडी रत्नागिरी येथील दक्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी आता ई पासची गरज लागणार नाही. त्यामुळं आता अंबाबाई मंदिराच्या चार दरवाजातून भक्तांना प्रवेश मिळणार आहे. तसेच जोतिबाच्या दर्शनासाठी आता पाची आवश्यकता भासणार नाही.

कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आता ई-पासची गरज लागणार नाही, देवस्थान समितीने ई पासची सक्ती रद्द केली आहे. चारही दरवाजांतून आजपासून मंदिरात प्रवेश घेता येणार आहे. भाविकांच्या मागणीचा आदर करून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीक़डून निर्णय घेण्यात आला आहे. तिकडे जोतिबाच्या दर्शनासाठी आता ईपासची गरज लागणार नाही. त्यामुळे आता सर्व भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

Team Global News Marathi: