उत्तर मुंबई भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांगलादेशी नागरिक – काँग्रेस

भाजपाचा उत्तर मुंबई अल्पसंख्यांक सेलचा अध्यक्ष बांगलादेशी नागरिक निघाला आहे. भाजपाचा पदाधिकारी चक्क बांगलादेशी निघाल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाची कोंडी केली आहे. तसेच भाजपाचा संघजिहाद हाच आहे का? असा सवाल भाजपाच्या नेत्यांना विचारला आहे.

या संदर्भातील व्हिडिओ ट्विट करून सावंत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले, काहीजण तर पाकिस्तानच्या ISI चे एजंट निघाले. आता भाजपाची प्रगती त्याच्याही पुढे झाल्याचा टोलाही सचिन सावंत यांनी लगावला आहे.

सावंत म्हणतात की, भाजपाचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले तर काहीजण पाकिस्तानी आयएसआयचे एजंट निघाले. हे सर्व आपल्यासमोर असताना भाजपाची प्रगती त्याच्याही पुढे झाली आहे. आता उत्तर मुंबई भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांग्लादेशी नागरिक रुबेल शेख निघाला. भाजपात ‘संघजिहाद’ ही नवीन पद्धत सुरु झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

Team Global News Marathi: